सस्नेह जय जिजाऊ,
"जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेमध्ये" आपले सहर्ष शिवस्वागत !
जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषद हा आदरणीय इंजि.पुरुषोत्तम खेडेकर यांनी बहुजनोद्धाराच्या विधायक उद्देशाने स्थापन केलेल्या मराठा सेवा संघाचा अत्यंत महत्वाचा कक्ष. साहित्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन आणि समाज परिवर्तनाच्या हेतूने गेली तीस वर्षे परिषद काम करत आहे.
महाराष्ट्राची सामाजिक भूमी संत, समाजसुधारक व महापुरुषांच्या पुरोगामी विचारांनी सुपीक झालेली व जगदगुरु तुकोबारायांच्या शब्दधनाने समृद्ध होऊन धारदार बनलेली आहे. अशा स्वयंभू विचाराने भारलेल्या तुकाराम व पुरोगामी-प्रगत विचारांचा वारसा वृद्धिंगत करणाऱ्या साहित्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेची निर्मिती व उभारणी होऊन त्याच चिकित्सक विचारांच्या बळावर परिषदेची वाटचाल सुरु राहणार आहे. त्यामधून नवीन साहित्यिकांचा शोध घेऊन त्यांच्या सर्जनशीलतेला बळ देण्यासाठी आणि बहुजन साहित्यिकांचे संघटन करणेसाठी परिषद झटत असते. असे साहित्यिक निर्माण होऊन समाज बांधणी करणारी साहित्य निर्मिती होण्याच्या हेतूने नवसाहित्यिकांच्या कार्यशाळा घेतल्या जातात. यादृष्टीने महाराष्ट्रभर मेळावे, व्याख्यानमाला आयोजित करून तुकोबाराय प्रणित शब्दांचे धन सर्व मराठी मुलखात वाटले जाण्यासाठी प्रबोधन मेळावे, व्याख्याने, परिसंवादांचे नियोजन परिषद करत असते. दुर्लक्षित आणि उपेक्षित समाजाला हक्काचं विचारपीठ उपलब्ध करून देण्याचं काम परिषदेनं नेहमी केलेलं आहे. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या भावना, त्यांच्या वेदना याचं प्रतिबिंब साहित्यात उमटावं यासाठी कार्यशाळा व चर्चासत्र घेणे यांसारख्या उपक्रमांतून परिषद प्रयत्नशील असते. मेळावे, व्याख्यानमाला, पाठांतर स्पर्धा, अभंग स्पर्धा, गावशिवार साहित्य संमेलनं, जिल्हास्तरीय साहित्य संमेलनं परिषदेनं वेळोवेळी आयोजित केली असून आजपर्यंत अकरा अखिल भारतीय साहित्य संमेलनं यशस्वीरीत्या पार पडली आहेत
आज आमची नवीन पिढी पदवीच्या मागे लागते, परंतु त्याबरोबरच भाषा व भाषाविषयक संशोधनाकडे नवीन पिढीला वळवून नवीन क्षितिजे निर्माण केली जाण्यासाठी परिषद संशोधित साहित्य व नवसाहित्यिकांचे दर्जेदार साहित्य प्रकाशित करण्यासाठी प्रकाशनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले आहे. ग्रामीण भाषा शब्दकोश, ग्रामीण म्हणीकोश, ग्रामीण व्यवहार कोशाची निर्मिती करण्यासाठी परिषद प्रयत्नशील आहे. बोली भाषेसंबंधी संशोधनात्मक व रचनात्मक कार्य करणारे विद्यार्थी घडविणेचे काम आम्ही करत आहोत. ग्रामीण शब्दकोश व लोककला यांच्या संवर्धनासाठीही विविध उपक्रम राबविण्यात येतात.
आज बहुजन समाज विद्यापीठीय अभ्यासक आहे पण तो व्यासंगी, वाचक नाही. नवीन पिढीचे वाचन संस्कारिकरण करण्यासाठी वाचनालयांची उभारणी केली जाईल. गाव तिथं वाचनालय करण्यासाठी परिषद आग्रही आहे. बहुजनातील साहित्यिकांच्या साहित्य कृतींसाठी प्रोत्साहनपर पुरस्कारांची निर्मिती करून साहित्य क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या साहित्यिकांचा विविध पुरस्कारांनी परिषदेच्या वतीनं सन्मान करण्यात येतो. तसेच नवोदित साहित्यिकांचे साहित्य समाजापुढं आणण्याच्या हेतूने नवसाहित्यिकांनाही पुरस्कार देण्यास परिषद अग्रेसर असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी "राज्यव्यवहार कोश" तयार केला. आजही शासकीय व्यवहारकोश आहे पण त्याचे संस्कृतकरण आपणास दुर्बोधतेकडे घेऊन जाते. नवीन शासकीय परिभाषा कोष निर्मितीचा प्रकल्प परिषद करू इच्छिते.
मराठी माणसाने मराठी नियतकालिकांवर खूप प्रेम केले, बहुजनांनी साहित्य निर्माण केले. आता अशा नियतकालिकांची गरज आपल्या वैचारिक चळवळीस आहे आणि ती पूर्णत्वास नेण्याचा मानसही आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत साहित्य परिषद ग्लोबल होत असतानाच शेतकरी कष्टकरी तरुण महिला यांनी चिकित्सक, विज्ञाननिष्ठ व प्रयत्नवादी व्हावे आणि परिषदेच्या माध्यमातून तयार झालेल्या साहित्याला वैश्विक उंची प्राप्त व्हावी म्हणून परिषद प्रयत्नशील असते. मराठी साहित्यविश्व आणि भावविश्वातील वैश्विक साहित्यिक जगदगुरु तुकोबाराय यांच्याप्रमाणेच परिषदेच्या माध्यमातून अनेक वैश्विक साहित्यिक घडोत हीच जिजाऊचरणी प्रार्थना !
🙏 जय जिजाऊ 🙏
— जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषद (@jagadguruTukoba) July 31, 2020
जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या अधिकृत ट्विटर खात्यावर आपले मनापासून शिवस्वागत 💐
चला, समाजोद्धारासाठीच्या परिवर्तन चळवळीत सहभागी होऊया !
साहित्य संमेलन - जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषद
साहित्य संमेलन | वर्ष | स्थळ | अध्यक्ष |
---|---|---|---|
१ | २००१ | अमरावती | डॉ. आ. ह. साळुंखे सर |
२ | २००२ | अहमदनगर | मा. शिवाजी सावंत |
३ | २००३ | चिपळूण | मा. विश्वास पाटील |
४ | २००४ | लातुर | डॉ. साहेब खंदारे |
५ | मे २००९ | नागपूर | मा. सुधाकर गायधनी |
६ | नोव्हें २००९ | जळगाव | मा. जैमिनी कडू |
७ | २०१० | सांगली | मा. प्रतिभाताई इंगोले |
८ | २०११ | औरंगाबाद | मा. प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील |
९ | २०१२ | चंद्रपूर | मा. बाबा भांड |
१० | जानेवारी २०१५ | उमरखेड, जिल्हा यवतमाळ | इंद्रजित भालेराव |
११ | जुन २०२० | ऑनलाईन | मा. प्रा. डॉ. अशोक राणा |
जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषद
अ नं | नाव | पद | फोन |
---|---|---|---|
1 | डॉ. निर्मलाताई पाटील | प्रदेशाध्यक्ष | ९८२२७२५६७८ |
2 | प्रा.डॉ. प्र. भा. काळे | प्रदेश कार्याध्यक्ष | ८४५९५८९३११ |
3 | सुरेश राऊत | प्रदेश उपाध्यक्ष | ९४२३८७५३१५ |
4 | सुनंदाताई जरांडे | प्रदेश उपाध्यक्ष | ९८८१२३४८८२ |
5 | बालाजी जाधव | प्रदेश महासचिव | ९७६७७०९२१३ |
6 | डॉ. स्वप्नील चौधरी | प्रदेश सहसचिव | ९६६५४४९७६५ |
7 | सतीश हानेगावे | प्रदेश संघटक | ९४२१३७४४१९ |
8 | इंजि. कुणाल अनिल पाटील | प्रदेश समन्वयक | +९६५-६६४९२९१४ (कुवैत) / ९४२३२७०६८२ (भारत) |
जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेमार्फत राबविले गेलेले उपक्रम
जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषदे मध्ये काढलेली छायाचित्रे.
जगदगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेने राबवलेल्या स्पर्धेचे विजेते
पत्ता - डॉ. स्वप्नील विलासराव चौधरी प्लॉट नं ५२, राम नगर, जारगाव चौफुली, पाचोरा, तालुका - पाचोरा, जिल्हा - जळगाव.
फोन - +९१ ९४२ ०२५ ७५६७
ई-मेल - j.tukobaraysahityaparishad@gmail.com
© 2024. मराठा सेवा संघ प्रणित, जगदगुरु तुकोबाराय साहित्य परिषद